⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सकाळी ६ वाजता शहरातील रस्ते चकाचक झालेच पाहिजेत – आयुक्त विद्या गायकवाड

सकाळी ६ वाजता शहरातील रस्ते चकाचक झालेच पाहिजेत – आयुक्त विद्या गायकवाड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | जळगाव शहरातील सर्व बोर्ड मधील दैनंदिन साफसफाई हि सकाळी सहा वाजता व्हायलाच हवी असे आदेश आयुक्त विद्या गायकवाड यांनी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत. बुधवारी आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त विद्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सकाळी सहा वाजता सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी लावून दैनंदिन वॉर्डची सफाई व्हायलाच हवी असे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. याच बरोबर जे कामगार रोज कामावर येत नाही व सतत गैर हजर राहतात यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही आदेश यावेळी आयुक्त यांनी दिले. जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ साफसफाईला देण्यात यावा असे यावेळी त्यांनी सांगितले व शहरातील लहान मोठे नाले पावसाळ्यापूर्वी साफ करून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

विद्या गायकवाड आयुक्त पदावर विराजमान झाल्यापासूनच त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी मनपा चे किती कर्मचारी कामावर येतात तेही वेळेवर कामावर येतात हे पाहण्यासाठी स्वतः मनपा मध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी आज घेतलेल्या बैठकीमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आपले काम चोख बसवावे असे आदेश दिल्याने जळगाव शहर कचरा मुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

तर दुसरीकडे जळगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न ही नागरिकांच्या महत्त्वाचा प्रश्न बनला आहे यामुळे जळगावच्या रस्त्यांच्या काम आहे विद्या गायकवाड यांच्या कार्यकाळात लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह