⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

पती पत्नीच्या संसारात प्रेयसीची एन्ट्री अन् मग..पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । पती पत्नीच्या संसारात तिसरी व्यक्ती आली म्हणजे संसार मोडतो हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं आहे. भुसावळ शहरातील एका भागात पती पत्नीच्या संसारात प्रेयसीची एन्ट्री झाली. प्रेमात अडथळा ठरत असल्याने पती पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करू लागला. याच छळाला कंटाळून पत्नीनिने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना २४एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल १५ दिवस छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात सोमवारी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज रविंद्रन पिल्लई असे आरोपीचे नाव आहे. पिल्लईचे त्याच्या ओळखीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पत्नी शरण्या एस पिल्लई ऊर्फ शरण्या मनोज पिल्लईने आडकाठी केली. त्याचा राग मनात धरून मनोज पिल्लई हा नेहमी पत्नी शरण्याला शिवीगाळ दमदाटी मारहाण करून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. याच जाचाला कंटाळून पत्नी शरण्याने २४एप्रिल २०२२ रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत शरण्याचे नातेवाईक धनुजा मेझुवाना कार्थीयायनीउ (वय ५५) यांनी सोमवार ९मे रोजी पोलिसात तक्रार दिली. शरण्याच्या मृत्यूस तिचा पती मनोज रविंद्रन पिल्लई हाच कारणीभुत असून त्याने पत्नी शरण्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरुन भुसावळ तालुका पोलीस स्थानकात मनोज रविंद्रन पिल्लई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे हे करीत आहेत.