⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मोबाईलवर पाठवला ओटीपी, महिलेने केला कॉल आणि डॉक्टरला लागला चुना

मोबाईलवर पाठवला ओटीपी, महिलेने केला कॉल आणि डॉक्टरला लागला चुना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । बँकतून बोलत असल्याचे बासवून एका ५२ वर्षीय डॉक्टराला ४९ हजाराची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की, शहरातील जोशी पेठेतील जेष्ठ डॉ. अलिम अहमद (वय ५२) वास्तव्यास आहेत. वैद्यकीय सेवा देवून आपला उदरनिर्वाह करतात. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना ८११४१७५१७३ क्रमांकावरून अनोळखी महिलेचा फोन आला. आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ट्रॅन्झॅक्शन होत आहे. ते बंद करावे लागेल. तुम्ही बंद करणार नाही; तर दर महिन्याला तुमच्या खात्यातून ४९ हजार ३१२ रूपयांचा अतिरीक्त भुर्दंड तुम्हाला सोसावा लागेल. असे सांगून डॉक्टरला ओटीपी नंबर बोलण्यात फसवणूक करून विचारून घेतला. त्यानंतर लागलीच डॉक्टरच्या खात्यातून ४९ हजार ६१२ रूपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह