⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | Suicide Note : आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते.. अज्ञात व्यक्तीने केलेल्या बदनामीमुळे ‘ती’ची आत्महत्या

Suicide Note : आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते.. अज्ञात व्यक्तीने केलेल्या बदनामीमुळे ‘ती’ची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । ९ मे २०२२ । बदनामी सहन न झाल्याने एरंडोल येथील रुपाली विश्वनाथ पाटील या ३४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, सुसाईड नोटवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, विवाहितेची बदनामी करणारा अज्ञात व्यक्ती कोण? याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून अज्ञात व्यक्तीस पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

काय आहे घटना?
एरंडोल येथील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या रुपाली पाटील या विवाहितेने २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या वेळी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली होती. रुपाली पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली असून त्यात एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. मयत रुपाली हिचे पच्छात नऊ वर्ष वयाचा मुलगा व तीन वर्ष वयाची मुलगी, पती असा परिवार आहे.

चिठ्ठीत भावनिक मजकूर

रुपाली पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्या घरच्यांचा काही दोष नाही. माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही. घरातील देव्हाऱ्याजवळ एक पर्स असून त्यामध्ये मी शिलाई काम करून जमवलेली रक्कम असून ती माझ्या मुलांची आहे असा मजकूर आहे. आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते. मात्र मी हरले असून मुलगा व मुलीस सांभाळून घ्या असा भावनिक मजकूर आहे. याबाबत श्रीराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली जुबेर खाटिक, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, राजेश पाटील तपास करीत आहेत. दरम्यान विवाहितेची बदनामी करणारा अज्ञात व्यक्ती कोण? विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाउल का उचलले याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून अज्ञात व्यक्तीस पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.