⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ग्रामीण पाेलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ६ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

गणेश गोपाळराव देशमुख (वय ३०) रा. पाटणादेवी रोड, सुमित अंबादास सोनावणे (वय २६) रा. घाटरोड, जाकीर शेख फारुख (वय ३२) रा. नागद रोड, प्रल्हाद दयाराम सूर्यवंशी (वय ३५ ) रा. अहिल्यादेवी नगर, राजू हिरालाल कुमावत (वय २९) पाटणादेवी रोड, मुकेश रणछोड राठोड (वय ५०) रा. हिरापूर ता. चाळीसगाव असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, रांजणगावाकडे जाणाऱ्या शिव रस्त्यालगतच्या एका शेताच्या शेजारी काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली हाेती. त्यांनी कारवाई पुढील कारवाईचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, नितीन आमोदकर, दिनेश पाटील, भगवान पाटील, शांताराम पवार, देवीदास पाटील व ज्ञानेश्वर बडगुजर यांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पत्याचा जुगार खेळताना सहा जण मिळून आले. त्यांच्याकडून रोकडसह २ दुचाकी व पत्याचा साहित्य असा एकूण ९८ हजार २७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना ताब्यात घेतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह