जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । उन्हाळी सुट्यांसह सण-उत्सवांमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी वाढल्याने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि थिवि तसेच मुंबई आणि मनमाड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-थिवि उन्हाळी विशेष गाडी
01045 लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवि उन्हाळी विशेष गाडीला 6 ते 24 मे दरम्यान एक दिवसाआड चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 01046 थिवि-लोकमान्य टिळक टर्मिनस उन्हाळी विशेष ट्रेनला 7 ते 25 मे दरम्यान एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई-मनमाड उन्हाळी विशेष गाडी
02101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-मनमाड दैनिक विशेष गाडीला 16 मे ते 30 जूनदरम्यान चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 02102 मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दैनिक विशेष गाडीला 16 मे 30 जूनदरम्यान चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, गाडीच्या वेळेत तसेच डब्याच्या संरचनेत वा थांब्यांमध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.











