Gold Silver Rate : आजचा सोने-चांदीचा भाव : ४ मे २०२२

मे 4, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । काल अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. तब्बल मंगळवारी सोन्याच्या किंमतीत ११२० रुपयाची तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यामुळे सोने ५२ हजाराखाली आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोने १५० रुपायांनी महागले आहे. तर चांदी २१० रुपयांनी वधारले आहे.

gold silver 3

आजचा सोने चांदीचा भाव?
आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,००० रुपये इतका आहे. तर चांदी ६३,९५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदी दरात घट होत असल्याचे दिसून आले. गेल्या मार्च महिन्यात रशिया-युक्रेन मधील युद्धादरम्यान, सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५५ हजारांवर गेला होता. तर चांदीच्या दर तब्बल ७३ हजारावर गेला होता. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली.

काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. पारंपारिक धारणेनुसार अक्षय्यतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाताे. तीन वर्षांनंतर अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचा योग साधण्यासाठी ४४ अंश तापमानात ग्राहकांनी सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली. दिवसभरात शहरातील सुवर्णपेठेत जवळपास २५ किलाे साेन्याची विक्री झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला असून गुढीपाडव्याच्या दुप्पट व्यवसाय झाल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या खरेदीत ग्राहकांनी तुकडा, शिक्का, लड या शुद्ध साेन्याच्या वस्तूंपेक्षा तयार दागिन्यांना पसंती दिली.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १३५० ते १४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील ३२५० ते ३३०० रुपयाने स्वस्त झाली आहे. तर या चालू आठवड्यात तीन दिवसात सोने दोन वेळा महागले आहे. तर चांदी दोन वेळा स्वस्त तर एक वेळा महागले आहे. तीन दिवसात सोने ५०० ते ५५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी १२५० रुपयांनी घसरली आहे.

गेल्या आठवड्यातील दर
सोने : जळगावमध्ये २५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,४९० रुपये होते. २६ एप्रिल रोजी ५२,६००, २७ एप्रिल रोजी ५२,७९० तर २८ एप्रिल रोजी ५२,४०० आणि २९ एप्रिल ला ५२,४६० प्रति तोळा इतका आहे.
चांदी : तर दुसरीकडे २५ एप्रिल रोजी चांदी दर ६८,११०, २६ एप्रिल ६६,६४०, २७ एप्रिल ६६,४९० तर २८ एप्रिल ला ६६,२००, आणि २९ एप्रिलला ६५,४२० प्रति किलो इतका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now