जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील मालोद येथील जि. प. प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका जहानुर अमिरखा तडवी या 30एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांची 36 वर्षे सेवा झाली.
त्यांचा सत्कार ग्रामपंचायत प्रशासक हबीब तडवी (ग्रामविस्तार अधिकारी) तसेच शाळेतील शिक्षक, परिवार व विद्यार्थ्यांनी यांनी केला. याप्रसंगी ग्रामपंचायत प्रशासक हबीब तडवी, ग्रामसेवक राजू तडवी, शिक्षक जितू आराक, अनिल तडवी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नबाब तडवी, शिक्षणतज्ञ समीर तडवी, शासकीय आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका व तलाठी ने उपस्थित होते.