धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग; दोन जणांविरोधात गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । पाचोरा तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय ग्रामपंचायत सदस्य महिलाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल झाला.

crime 55 jpg webp

अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला ही ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम पाहतात. १मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महिला ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत कार्यालयात असताना गावातील बापूराव रामराव देवकर आणि अनंतराव रामराव देवकर यांनी कारण नसता शिवीगाळ केली. तसेच पीडित महिलेच्या सासूला देखील मारहाण करून गळ्यातील सोन्याची होत तोडून नुकसान केले तर ग्रामपंचायत सदस्याला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बापूराव रामराव देवकर आणि अनंतराव रामराव देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now