अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

एप्रिल 30, 2022 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । शिरसोली येथील अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याचे घटना नुकतीच उघकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 10 1 jpg webp

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली गावातील १६ वर्षीय मुलगी दि २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कानळदा येथील राहणारा किसन पिंटू बारेला याने अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून संशयित किसन पिंटू बारेला याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहेत .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now