खुशखबर.. अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी स्वस्त, वाचा प्रति तोळ्याचा भाव

एप्रिल 30, 2022 10:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । अक्षय तृतीयाच्या (Akshay Tritiya)पूर्वसंध्येला सोने खरेदीसाठी इच्छूक असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या (Gold) दरात घसरण दिसून आलीय. सोबतच चांदीही घसरली आहे. आज शनिवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,४६० रुपये इतका आहे. तर चांदी ६५,४२० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

gold

गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात जवळपास ७०० रुपयाची घसरण झाली होती. तर दुसरीकडे चांदी २४०० रुपयापर्यंतची घसरण झाली होती. तर या आठवड्यात सोन्याच्या भावात १३५० ते १४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील ३२५० ते ३३०० रुपयाने स्वस्त झाली आहे.

यापूर्वी गेल्या मार्च महिन्यात रशिया-युक्रेन मधील युद्धादरम्यान, सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५५ हजारांवर गेला होता. तर चांदीच्या दर तब्बल ७३ हजारावर गेला होता. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदी दरात घसरण सुरु आहे.

दरम्यान, यंदा ३ मे रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त माणण्यात येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, आणि यंदा सोन्याचे दर स्वस्त झाल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोने पे सुहागा अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात सोन्याची मागणी वाढली असताना देखील सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे.

या आठवड्यातील दर
सोने : जळगावमध्ये २५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,४९० रुपये होते. २६ एप्रिल रोजी ५२,६००, २७ एप्रिल रोजी ५२,७९० तर २८ एप्रिल रोजी ५२,४०० आणि २९ एप्रिल ला ५२,४६० प्रति तोळा इतका आहे.
चांदी : तर दुसरीकडे २५ एप्रिल रोजी चांदी दर ६८,११०, २६ एप्रिल ६६,६४०, २७ एप्रिल ६६,४९० तर २८ एप्रिल ला ६६,२००, आणि २९ एप्रिलला ६५,४२० प्रति किलो इतका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now