वेटरनेच मारला गल्ल्यावर डल्ला; पोलीसांनी घेतले ताब्यात

एप्रिल 29, 2022 2:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२। नांद्रा बु येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनेच गल्ल्यातून रोकड व मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

crime 7 1

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, तालुक्यातील नांद्रा बुद्रूक विजय भिकनराव सोनवणे यांची कानळदा गावात उत्कर्ष नावाने हॉटेल आहे. या हॉटलातील वेटर सागर ठाकरे याने हॉटेलातील गल्ल्यातून ७० हजार रुपयाची रोकड तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स लांबविल्याची घटना गुरुवारी २८ एप्रिल रोजी समोर आली. याप्रकरणी हॉटेल मालक विजय सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर संशयित वेटर सागर ठाकरे यास ताब्यात घेतले असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now