जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । येथिल महाबळ परिसरातील मोहन नगर येथे चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह ५८ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मोहन नगरातील रहिवासी उज्वल दत्तात्रय ठाकूर (वय-२६) वृंदावन गार्डन जवळ, हे दि १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून नगर येथे काकाकडे गेले होते. बंद घर पाहून संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळच्या सुमारास शेजारच्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. शंका आली. त्यांनी लागलीच फोन करून सांगितले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. उज्वल हे घरी आल्यावर घरातील सर्व सामान अस्तव्यस्त दिसून आला. याप्रकरणी बुधवार दि २८ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात उज्ज्वल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी हे करीत आहेत.













