पायी जाणाऱ्या मजुराचा अपघाती मृत्यू

एप्रिल 26, 2022 3:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ एप्रिल २०२२ । रस्त्याने पायी जाणाऱ्या मजूराला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.उपचारादरम्यान मात्र जखमीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

crime 2 1 jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील नामदेव श्रावण सोळंके (वय-४३) हे मजुरीकाम करुन त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. ९ एप्रिल रोजी कामानिमित्ताने ते विदगाव कोळन्हावी रोडने पायी जात असतांना त्यांना समोरुन एम.एच. १९ बी.पी.९९६४ या क्रमाकांच्या दुचाकीने धड‍क दिली होती. या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्यास तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला होता.

मयत नामदेव सोळंके यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई तसेच बादल व सौरभ हे दोन मुले असा परिवार आहे. या अपघातप्रकरणी मयत नामदेव सोळंके यांचा मुलगा बादल सोळंके वय १९ याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, २५ एप्रिल रोजी दुचाकीस्वार सचिन दिनकर सावळे चुंचाळे ता. यावल याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणीक सपकाळे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now