आईसक्रीम लवकर दे म्हटल्याने विक्रेत्याकडून तरुणास मारहाण

एप्रिल 25, 2022 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२। आईसक्रीम मागण्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना हि अजिंठा चौकात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime ३ 4

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गणेश भगवान लोहार (वय-२४) रा. राका चौक, एमआयडीसी हा २२ एप्रिल रोजी अजिंठा चौकात आईसक्रीम घेण्यासाठी गेला होता. आईसक्रीम दुकानावरील शिवा पुरभीया याला लवकर आईसक्रीम दे असे सांगितल्याचा राग आल्याने शिवा पुरभीया, गोविंद शिवा पुरभीया आणि रामुलाल पुरभीया सर्व रा. अजिंठा चौफुली जळगाव यांनी हातात लाकडी दांडा व फायटरने गणेशला बेदम मारहाण केली. याप्रकरणी गणेश लोहार यांनी २४ एप्रिल रोजी रात्री संशयित तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now