रावेरला वीजचोरी करणाऱ्या ३० जणांवर धडक कारवाई

एप्रिल 23, 2022 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । रावेर शहरातील वीज वितरण कंपनीतर्फे शुक्रवारी विविध भागात राबवलेल्या मोहीमेत, वीजचोरी करणाऱ्या ३० जणांवर कारवाई करण्यात आली.

action 1 1

वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ३० घरांमधून वीजचोरी पकडून, वीजचोरीचे साहित्य जप्त केले. यापुढे वीजचोरी प्रकरणी रोज कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता दिलीप सुंदराणी व कर्मचाऱ्यांनी धडक मोहीम राबविली. या वेळी ३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. चोरी करणाऱ्या नागरिकांना दोन दिवसात त्यांच्या वीज वापरानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक अभियंता दिलिप सुंदराणी यांनी दिली. वीजचोरीविरुद्ध राबवलेल्या पथकात बी.सी साळुंके, कलिंदर तडवी, उत्तमगिर गोसावी, तुषार चौधरी, धनंजय पाटील, अमोल हिवरे, सतिष सांगळे, चेतन भारते, अरुण माळी, कल्पेश पाटील यांचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now