जळगाव शहर

केंद्रीय मंत्री जळगावात येताच खा.उन्मेश पाटलांचे ट्विटर अकाउंट हॅक

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना.नितीन गडकरी हे आज दि २२ एप्रिल रोजी महामार्गांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी शहरात दाखल झाले आहेत. ना.नितीन गडकरी जळगावात दाखल झाल्यानंतर काही मिनिटांमधे भाजपचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे ट्विट अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येतेय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

image 9

खा.उन्मेश पाटील यांचे ट्विटर अधिकृत खाते काही वेळापूर्वी हॅक झाले असून एका हॅकरने काही वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी जळगावात आले असून त्यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून खा.उन्मेश पाटील मोठी धावपळ करीत होते. खा.पाटील यांचे खाते हॅक झाल्याप्रकरणी अद्याप कुठेही तक्रार दाखल झालेली नाही.

https://mobile.twitter.com/unmeshpatilbjp

image 10

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button