अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

एप्रिल 22, 2022 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२। शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

crime 8

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस २१ एप्रिल रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान संशयित सचिन नामक तरुणाने फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now