७४ वर्षीय वृद्धाची पाराेळ्यात फसवणूक

एप्रिल 22, 2022 1:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । जोगलखेडे येथील ७४ वर्षीय वृद्धाला एका तरुणाने बोलण्यात गुंग ठेवत व दिशाभूल करत त्यांच्या हातातील ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी येथील पोलिसांत त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दा

crime 18 jpg webp

अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील विरभान भिकन पाटील (वय ७४) हे पारोळा येथील नगरपालिका चौकात १० रोजी दुपारी १२.३० वाजता भाजीपाला घेत हाेते. या वेळी एका अज्ञात तरुणाने त्यांना बोलण्यात गुंग ठेवत व दिशाभूल करत त्यांच्या हातातील ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर हा तरुण फरार झाला. याबाबत २१ रोजी पारोळा पोलिस ठाण्यात त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now