त्र्यंबक नगरातील तरूणाची ऑनलाईन फसवणूक

एप्रिल 21, 2022 2:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ एप्रिल २०२२ । शहरातील एका तरुणाच्या फ्लीककार्टच्या वॉलेटवरुन २९ हजार ७९७ रुपयांची ऑनलाईन खरेदी करुन त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime ३ 1 jpg webp

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील त्र्यंबक नगरातील विश्वजीत अपार्टंमेंट येथे तेजेश्वरराव गोकूळ पाटील वय ३२ हे वास्तव्यास आहेत. तेजेश्वरराव यांच्या फ्लीककार्टच्या वॉलेटवरुन अज्ञात व्यक्तीने परस्पर खरेदी करून तब्बल २९ हजार ७९७ रुपयांत ऑनलाईन खरेदी करुन फसवणूक केली. दि २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास फसवणूक करणार्यांनी हि खरेदी केल्याचे समोर येत आहे. फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर तेजेश्वरराव यांनी दि २० एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now