Suicide : तुला पूर्णपणे फ्रीडम घे.. सुसाईड नोट लिहून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

एप्रिल 21, 2022 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथील रहिवासी व अभोणा (ता.कळवण) येथील माहेरवाशीण २६ वर्षीय विवाहितेने रविवारी रात्री ९ते १२च्या दरम्यान अभोण्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना विवाहितेने इंग्रजीत लिहिलेली सुसाइड नोट आढळून आली. विशाखा शैलेश येवले-वेढणे असे मृत विवाहितेचे नाव आहे. संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे तर सासू-सासरे फरार आहेत.

suicide 1 1

अधिक माहिती अशी की, नऊ महिन्यांपूर्वीच (१३ जुलै २०२१) विशाखाच्या कुटुंबीयांनी कळवण येथे तिचा थाटामाटात विवाह करून दिला होता. विवाहानंतर मात्र ‘पती शैलेश यास इस्कॉन धार्मिक संस्थेत मोठे होण्यासाठी संन्यास घ्यायचा होता. तुझ्याशी फक्त हळद लावण्यापुरतेच लग्न केले आहे. तुझ्याशी कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवता येणार नाही. तू येथे राहू नको, येथून निघून जा व आम्हाला मोकळे कर’ असे वारंवार बोलून सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ तन्मय नरेंद्र वेढणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभोणा पोलिसांनी पती शैलेश रमेश येवले, सासरे रमेश महादू येवले, सासू रंजना रमेश येवले (सर्व रा. घाटरोड, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती शैलेश यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात अाले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एकनाथ भोईर तपास करत आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now