सोने कारागिराची धावत्या रेल्वेखाली ची आत्महत्या

एप्रिल 20, 2022 12:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । धावत्या रेल्वे खाली स्वताःला झोकून देत तरुणाने आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस ठण्यात करण्यात आली आहे.

crime 5 jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, येथील मारोतीपेठ परिसरातील रहिवासी प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८) रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्‍यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगत दुकानातून निघून गेला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजून आले नाही. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधाराकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. या घटनेसंदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now