जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव संपूर्ण राज्यावर पडणार आहे. येत्या गुरुवारपासून राज्यावर अवकाळीचे सावट राहणार आहे.

विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि साेसाट्याच्या वाऱ्यासह येणाऱ्या अवकाळीमुळे रब्बी पिकांचे माेठे नुकसान हाेण्याची भीती आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रावाताची स्थिती राज्यावर अवकाळीचे संकट घेऊन आले आहे. जळगावात एप्रिल महिन्यात सतत पारा ४२ अंशांपुढे राहिला. अपवाद वगळता सलग तापमान ४३ अंशांवर आहे. साेमवारी कमाल तापमान ४२.८ अंशांवर पाेहाेचले हाेते. वाऱ्याचा वेग ताशी ११ ते २२ किमीपर्यंत हाेता. त्यामुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र जाणवत हाेत्या.