कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख अनुदान

एप्रिल 17, 2022 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । नगरपरिषद क्षेत्रातील कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देणेचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. पाचोरा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी  राजेंद्र देवचंद भिवसने, क्लिनर यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोव्हिड-१९ चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने तसेच  नरेंद्र युवराज अहीरे, समुदाय संघटक यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-१९ चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी पाचोरा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करणेत आला होता.

corona update

पाचोरा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झालेने प्रती मयत कर्मचारी ५०लाख रुपये मात्र याप्रमाणे एकूण १ कोटी मात्र सानुग्रह सहाय्य अनुदान नगरपरिषदेस प्राप्त झालेले आहे. आज दि.१४ रोजीी  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक, पाचोरा नगरपरिषद यांचे दालनात श्रीमती शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे हस्ते दोन्ही मयत कर्मचारी यांचे वारस नामे श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला नरेंद्र अहीरे यांना प्रत्येकी ५० लाख मात्र सानुग्रह सहाय्य अनुदानाचे धनादेश वितरीत करणेत आले. श्रीमती शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी दोन्ही वारस श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला  नरेंद्र अहीरे याना सानुग्रह अनुदानाची रक्कम ही मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी पैशाचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे कुटूंबियांचे सात्वंन देखील केले.

किरण राजेंद्र भिवसने व पंचशिला नरेंद्र अहीरे यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी रक्कम रूपये ५० लाख मात्र सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून मुख्याधिकारी  व तसेच नगरपरिषद पाचोरा प्रशासनाचे आभार मानले.  तसेच सदर अनुदान प्राप्त होणे साठी   विशाल दिक्षीत, आस्थापना लिपीक यांनी सतत पाठपुरावा करून अनुदान मागणी साठी विशेष प्रयत्न केले म्हणून त्यांचे विशेष आभार मानले,  सदर प्रसंगी उपमुख्याधिकारी  डी.एस. मराठे, प्रशासकिय अधिकारी  प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, तसेच पाचोरा नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now