तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 17, 2022 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । व्यवसायासाठी उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड होत नसल्यामुळे नैराश्यात तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश भिका बोरसे (वय ३६, सदोबानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली.

gadfarahtyaghari jpg webp

मूळचे धरणगाव तालुक्यातील रवंजे येथील राहवासी आहे. गणेश बोरसे हे कामानिमित्त सदोबानगरात आले होते. भाड्याने खोली घेवून ते पत्नीसह राहत होते. त्यांनी मोबाइल, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान टाकले होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. दुकान टाकण्यासाठी त्यांनी काही जणांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड होत नसल्यामुळे काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. १५ रोजी घरी कुणीच नसतांना त्यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नितीन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now