मोठी बातमी ! जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर हाेण्याची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील १७ हजार संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याची घाेषणा केली आहे. यामुळे जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत ऑगस्ट २०२०मध्ये संपलेली आहे.
प्रशासक काळानंतर जिल्हा सहकारी दूध संघाची पहिली निवडणूक सन २०१५मध्ये झाली हाेती. सन २०२०मध्ये या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपली; परंतु काेराेनामुळे निवडणूक घेता न आल्याने या संस्थेच्या संचालक मंडळाला दीड वर्षापासून मुदतवाढ मिळाली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आता डिसेंबर २०२० आणि डिसेंबर २०२१पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियाेजन केले अाहे. याबाबत जिल्हा पातळीवर चाैथ्या, पाचव्या अाणि सहाव्या टप्प्यात निवडणुकीची तयारी केली जाते आहे. जिल्हा बँक अाणि ग.स. साेसायटी या दाेन माेठ्या संस्थाच्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. या टप्प्यात जिल्हा दूध संघ अाणि नुतन मराठा संस्थेची निवडणूक असणार आहे.