⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जाणून घ्या… तुमच्या तिसऱ्या ‘बूस्टर डोस’ची तारीख, केव्हा आणि कशी मिळणार लस

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे (omicron) संकट लक्षात घेता शासनाने नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे. सुरुवातीला पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस दिली जाणार असून त्यानंतर इतरांचा नंबर लागणार आहे. शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत तिसरा डोस केव्हा मिळणार आहे याची तारीख दर्शविली जात आहे.

आपल्या तिसऱ्या लसीची तारीख काय आहे आणि ती कशी माहिती करून घ्यावी याची माहिती आम्ही आपणास देणार आहोत. सर्वप्रथम केंद्र शासनाने सुरु केलेल्या कोविन या वेबसाईटवरील पुढील https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकवर क्लीक करावे. त्यानंतर आपण लस घेतांना नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ठ करून ओटीपीसाठी रिक्वेस्ट पाठवावी. मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक आल्यानंतर आपणास तिसरी लस केव्हा मिळणार, अदयाप किती दिवस वाट पाहावी लागणार हे समोर दिसेल.

एकाच क्रमांकावर अनेकांची नोंदणी केलेली असल्यास सर्वांची माहिती त्याच लॉगिनवर पाहायला मिळणार आहे. तसेच आपण लॉगिन केल्यानंतर यापूर्वी घेतलेल्या दोन डोसचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील कोवीन वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा :