राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या… जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । माझा चेहरा हा नागाच्या फण्यासारखा आहे असं म्हणता तर तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. वैयक्तिक कोट्यात मिमिक्री आर्टीस्टची जागा खाली आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
ठाण्याला काल झालेल्या उत्तरसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला कि ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर ३ मे नंतर सर्व मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर ताशेरे ओढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल राज ठाकरे यांनी टीका करीत ‘जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा म्हणजे नागाने फणा काढावा असा आहे, आता उद्या म्हणेल डसू शकतो वैगरे, ये, शेपूच धरून गरगर फिरवितो आणि फेकून देतो’ अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणत होते, इथल्या कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला तरी मी सन्यास घेईन, अरे सापडेल कसा? दाढी करतच नाहीत, याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. याचवेळी राज ठाकरे यांनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादीच वाचून दाखवली.
पहा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड :