⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

शिंदे – फडणवीसांना शेतकऱ्यांसाठी बैठका घ्यायला, मदत करायला वेळ नाही – एकनाथ खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्नाटकमध्ये प्रचाराला जायला वेळ आहे; पण अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांसाठी बैठका घ्यायला मदत करायला वेळ नाही अशी टीका आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रामुख्याने खान्देशात अवकाळी पाऊस, वादळ वारा आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण. अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. नुकसानग्रस्तांना मदत करू, असे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र अजून तरी शेतकऱ्यांना एक रुपयाची देखील मदत झालेली नाही. असे खडसे म्हणाले.

शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पवारांना मानणाऱ्या वर्गामध्ये अस्वस्थता होती. अशा परिस्थितीत शरद पवारांचा निर्णय धक्कादायक होता, असे ते म्हणाले.

बारसू रिफायनरीबद्दल मतभिन्नता असू शकते, परंतु बारसू ही कुणाची मालमत्ता नाही, त्यामुळे तिथं जायला कुणीच मज्जाव घालू शकत नाही. भाजपने आव्हान दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे दौरा केला. उद्भव ठाकरेंनी बारसू दौरा केल्याने त्याची सहानुभूती शिवसेनेला मिळेल, या भीतीनेच भाजपने मोर्चाची घोषणा केली. आशी टीकाही खडसे यांनी केली