⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

त्यांना वाईनसाठी वेळ मिळाला मात्र…‘वेदांता’वरून गिरीश महाजनांचा हल्लाबोल

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प कोणामुळे गेला? यावरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप तर विरोधी पक्षातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता या प्रकरणी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

काय म्हणाले गिरीश महाजन?
वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता असा टोला यावेळी महाजन यांनी लगावला आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी ते राज्य सरकारवर अनाठायी टीका करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

यादरम्यान, गिरीश महाजन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केलीय. तुम्ही नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून, भाजपाच्या नेत्यांना भाषणाला बोलवून निवडून आलात, आणि नंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.आधी त्यांनी राजीनामा देऊन निवडून दाखवावे असे आव्हान गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केले.