सरपंचांनी केला निवृत्त जवान निलेश पाटील यांचा सत्कार

एप्रिल 13, 2022 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । न्हावी येथील रहिवासी नीलेश दिनकर पाटील हे भारतीय सैन्य दलातील २४ मराठा लाईट इन्फट्रीमधून १७ वर्ष सेवा करुन निवृत्त झाले आहेत. यानिमित्त बुधगाव येथील सरपंच सुनीताबाई साळुंखे व गुलाबराव साळुंखे यांनी नीलेश पाटील यांचा सत्कार केला.

patil 7 jpg webp

सत्काराला उत्तर देताना नीलेश पाटील म्हणाले की, सैनिक झाल्याने जात विसरलो. सैनिकाला केवळ एकच जात असते, ती फक्त सैनिक, असे त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी सैन्य दलात जावून देशाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या प्रसंगी नीलेश पाटील यांच्या पत्नी सोनाली पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now