बापाचा खुन करणाऱ्या दोघी मुलांना पोलिस कोठडी

एप्रिल 12, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । पाचोरा शहरात भास्करनगर भागात कौटुंबीक वादातून प्रौढाचा चाकूने वार करून खून झाल्याचा प्रकार रविवारी उघड झाला होता. या प्रकरणी मृताच्या पत्नीने आपल्या दोन्ही मुलांविरुद्ध फिर्याद दिली. त्यामुळे दोन्ही मुलांविरुद्ध पित्याच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला. दोघांना न्यायालयाने ११ रोजी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

court order jpg webp

अधिक माहिती अशी की, भास्कर नगरातील संजय बंकट खेडकर (वय ४६) हे कुलर निर्मिती, दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांचे नेहमी पत्नीसोबत भांडण होत असे. ९ एप्रिल रोजी रात्रीही पती पत्नीमधे भांडण झाले होते. नेहमीच्या होणाऱ्या भांडणास कंटाळून खेडकर यांची मुले मनोज व प्रतीक यांनी, पित्याच्या पोटावर व छातीवर चाकूने वार करुन खून केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now