भुसावळातील ट्रामा केअर सेंटरजवळ चार वाहने एकमेकांवर धडकली; एक ठार, तिघे जखमी

एप्रिल 11, 2022 3:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । भुसावळ येथील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरसमोर चार वाहने एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाल्याची घटना दि ११ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाल्याची भीती असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

accident १

या विचित्र अपघातात लागोपाठ एकमेकांवर वाहने आदळली विकास दुधाची वाहतूक करणारे आयशर वाहन दुसर्‍या दूध वाहतूक करणार्‍या 407 (एम.एच.04 ई.एल.7237) ला जळगावकडे घेवून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेला डंपर (एम.एच.19 डी.यु.5895) धडकला व त्याचवेळी इंडिगो (एम.एच.45 एन.4367) येवून धडकल्याने एक जण जागीच ठार झाला तर अन्य वाहनातील तिघे जखमी झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी पोलीस पाहणी करीत घटनेची नोंद करीत होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now