वरणगाव येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग

एप्रिल 11, 2022 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला. ही घटना वरणगाव येथे घडली आहे. या प्रकरणी येथील पोलीसांत तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. गावातील संशयित आरोपी संदीप लखीचंद बनवे (वय ३८) हा तरुण ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्यावर अतिप्रसंग करत जबरदस्ती प्रयत्न करू लागला. तिने हटकले असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला धमकी दिली. या प्रकरणी महिलांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी संदीप लखींचेद बनवे याच्या विरोधात तक्रार दि. महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now