थरारक घटना : आईच्या मदतीने मुलांनी केला पित्याचा खून

एप्रिल 11, 2022 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा दोन मुलांनी आईच्या मदतीने चॉपर हत्याराने चोपचप वार करून खून केला. संजय बंकट खेडकर (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही थरारक घटना चोपडा शहरातील भास्करनगरात रविवारी पाहटे घडली. या प्रकरणी पत्नी व दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे.

crime 49 jpg webp

अधिक माहिती अशी की, भास्कर नगर येथे वास्तव्यास असलेला मयत संजय बंकट खेडकर (वय ४७) यांचे आपल्या पत्नीशी नेहमी काहीना काही किरकोळ कारणांवरून भांडण होत असे. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्रभर पती पत्नीमधे भांडण झाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुले मनोज संजय खेडकर (वय २१), प्रतिक संजय खेडकर (वय २३) व पत्नी वंदना संजय खेडकर (वय ४३) यांनी चाकूने वार करुन संजय खेडकर यांची हत्या केली. माझा पती संजय हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून मला घरात येण्यासाठी मज्जाव करीत आहे व तू जर घरात आली तर मी तूला चाकू खूपसून मारुन टाकेल नाहीतर मी स्वतः हा चाकू खूपसून मारुन जाईल अशी धमकी देत असून त्यांचेपासून माझे जिवास धोका असल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करा असे सांगितले. या रात्री उरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now