⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

‘या’ तारखेपासून राज्यात उष्णतेची लाट ओसरणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने अंगाची काहिली होत आहे. राज्यातील अनेक जिल्हयातील पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे उकाड्यापासून नागरिक प्रचंड हैराण झाले आहे. अशातच हवामान खात्याने येत्या १३ एप्रिलनंतर उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाला पोषण हवामान असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारा काही दिवसापासून स्थिर आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत आहे. काल जिल्ह्यातील तापमानाचा ४२.२ अंश नोंदविला गेला. दरम्यान, कोकण आणि राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान असून, आज ढगाळ हवामान, विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रमुख शहरांतील तापमान
अकोला ४३.६, अमरावती ४३.०, वाशिम ४३.०, मालेगाव ४२.६, जळगाव ४२.५, वर्धा ४२.२, चंद्रपूर ४२.०, औरंगाबाद ४१.०, बुलढाणा ४१.०, नांदेड ४१.०, यवतमाळ ४०.५, परभणी ४०.५, नागपूर ४०.४, गोंदिया ४०.२,सोलापूर ४०.२, नाशिक ३७.८

दोन दिवस किरकोळ पावसाचा अंदाज
विदर्भासह राज्यातील काही भागात सोमवारपासून ( दि. ११ एप्रिल) दोन दिवस किरकोळ पावसाची शक्यता व र्तविण्यात येत आहे. कांदा, द्राक्ष, कडधान्ये, सोयाबीन, भाजीपाला, बेदाणा निर्मितीस आठवडाभर वातावरण सुरक्षित आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, शिरपूर, चोपडा, रावेर, यावल, जामोद, संग्रामपूरसह नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा या अादिवासी भागात तसेच ठाणे जिल्ह्यात बुधवार (दि. १३) पर्यंत उष्णता जाणवणार असल्याचे हवामान तज्ज्ञ म्हणले.