⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | माजी सैनिकाने गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी भेट दिला संगणकांचा सेट

माजी सैनिकाने गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी भेट दिला संगणकांचा सेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.दे.येथील आदर्श अकॅडमीला माजी सैनिक तात्यासाहेब विकास देवरे यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, या हेतूने सहा संगणकचा सेट भेट दिला. त्याचे उद्घाटन देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून वाल्मिक गरुड (माजी सैनिक), नगरसेवक रामचंद्र जाधव, पं.स.सदस्य शिवाजी सोनवणे, भिमराव पाटील (ग्रामपंचायत सदस्य), वाल्मिक सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, रवींद्र मोरे, दीपक मिस्तरी, अकॅडमीचे शिक्षक सोनू यशोद, प्रवीण मोरे तसेच सुनीता मोहिते व नातेवाईक उपस्थित होते.

कौतुक

तात्यासाहेब विकास देवरे समवेत अनेक मान्यवरांनी लाल फित कापून उद्घाटन केले, अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विधार्थ्यांना मार्गदर्शन केले, अकॅडमीचे संचालक सिद्धार्थ आर.मोहिते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. दरम्यान माजी सैनिकाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह