नशिराबाद डाॅ. आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आनंदा रंधे
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२। नशिराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती अध्यक्षपदी आनंदा रंधे तर उपाध्यक्षपदी दीपक सपकाळे यांची निवड करण्यात आली.
नशिराबाद येथे बौद्ध समाज पंच मंडळाची बैठक तथागत बौद्ध विहारात बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ही निवड करण्यात आली. १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता तथागत बुद्धविहार येथे धम्म ध्वजाचे पूजन करण्यात येईल. सकाळी ८.३० वाजता मातोश्री रमाबाई नगर येथून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ५ वाजता तथागत बुद्ध विहारापासून मिरवणुकीने सुरुवात होईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
अध्यक्ष आनंदा रंधे, उपाध्यक्ष दीपक सपकाळे, सचिव सिद्धार्थ तिगोटे, खजिनदार पवन रंधे, सदस्य भीमराव सोनवणे, अजय सोनवणे, कल्पेश वानखेडे, आदित्य वाले, जितेंद्र सोनवणे, अक्षय रंधे, पंकज वाघ, नितीन भालेराव, सागर देवडे, राहुल वानखेडे, सागर मगरे, संजय अमर भालेराव, रवींद्र रंधे, दिनेश रंधे, चंद्रशेखर सुरवाडे, योगेश बोरसे, विपुल रंधे, संदीप रंधे यांची निवड करण्यात आली. बैध्द पंच मंडळाचे शांताराम सोनवणे, रमेश रंधे, प्रकाश सपकाळे, दीपक सोनवणे, श्रावण बिराडे, राजू वाघ अादी उपस्थित हाेते. बैठकीचे सूत्रसंचालन तुषार रंधे यांनी केले. आभार सतीश सावळे यांनी केले.