पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली

सप्टेंबर 13, 2021 11:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या आत्महत्येच्या ऑडीओ क्लिपमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आमदार लंके विरुद्ध त्यांचा वाद असल्याची चर्चा होत होती. पण आता ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेचा पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

tahsildar devare nagar to jalgaon jpg webp

गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे चर्चेत आल्या होत्या. क्लीपमध्ये लोकप्रतिनिधींच्या व्यापमुळे आत्महत्या करण्याचा उल्लेख असल्याने राज्यात खळबळ उडाली होती. क्लीपमध्ये कुणाचाही उल्लेख नसला तरी तो रोख आमदार निलेश लंके यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते.

क्लीप प्रकारानंतर विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती अँड.असीम सरोदे यांनी दिली. तक्रारदार राहुल झावरे यांच्यामार्फत देवरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

वाळूचे ठेके व दंड सरकारकडे जमा न केल्याचा ठपका देवरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकायुक्त नियुक्त झाल्यानंतर ही पहिली तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातच ही तक्रार दाखल झाली आहे. देवरे यांनी प्रांताच्या अधिकार वापरल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.

ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांमध्ये देखील फूट पडली होती. दरम्यान, तहसीलदार देवरे यांची अखेर बदली झाली असून जळगाव संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार पदाचा कार्यभार त्यांना सोपविण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now