बोहल्यावर चढण्याआधीच काळाने गाठले, दुचाकी अपघातात दोन युवक ठार

डिसेंबर 1, 2021 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । एकीकडे लग्नाची बोलणी सुरु असताना त्यातच घाटनांद्रा येथील तरुणावर काळाने क्रूर झडप घातली. दुचाकींच्या झालेल्या समोरा-समोर धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यात घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३) तर निलेश लाकडिया बारेला (वय २५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनांमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

accident jpg webp

सविस्तर असे की, घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३,) हा सेंधवा येथून, निलेश लाकडिया बारेला (वय २५,) याला सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.२०-डी.एन.५९६२) येत होता. भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ समोरून येणार्‍या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे व निलेश लाकडिया बारेला हे दोघे जागीच ठार झाले. तर समोरच्या दुचाकीवर असणार्‍या तिघे जखमी झाले असून, त्यांनी घटनास्थळावून पळ काढल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.

दरम्यान, मृत बबलू उर्फ रामेश्‍वर मोरे याच्या विवाहाची बोलणी सुरू होती. मात्र, या अपघातामुळे बोहल्यावर चढण्याआधीच त्याला काळाने गाठले. यामुळे मोरे कुटुंबावर आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now