30 एप्रिल पर्यंत अहवाल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

एप्रिल 8, 2022 8:54 PM

Collector-Office-Jalgaon


जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निम शासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे 31 मार्च,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 एप्रिल, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

         या अनुषंगाने माहे 31 मार्च, 2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता  (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या  नियोक्ता लॉग –इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने दि.30 एप्रिल, २०२2 पर्यंत भरावे अथवा सोबत जोडलेल्या Format मध्ये माहिती भरुन या कार्यालयाचा ईमेल [email protected] वर वरील मुदतीत सादर करण्यात यावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र.०२५७-२९५९७९०  किंवा श्री.अमिन तडवी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांचे 8668817893 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now