आयएमएच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

एप्रिल 7, 2022 3:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२। येथील आयएमएच्या जळगाव शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण साेहळा ३ एप्रिल राेजी पार पडला. आयएमएचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डाॅ. सुहास पिंगळे, राज्य सचिव डाॅ. मंगेश पाटे, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील, एचबीआय बाेर्डाचे डाॅ. अनिल पाटील, डाॅ. स्नेहल फेगडे यांच्या उपस्थितीत झाला.

ima 1 1

नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक आठवले यांनी मावळते अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी यांच्याकडून तर नवनिर्वाचित सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे यांनी मावळते सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. उपाध्यक्ष डॉ. सुनील नहाटा, जॉइंट सेक्रेटरी डॉ. सुशील कुमार राणे, डॉ. धीरज चौधरी, खजिनदार डॉ. पंकज पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. विनोद जैन यांचाही पदग्रहण सोहळा करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now