गुन्हे

दुर्दैवी! सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण : अपघातात तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । शहरातील गुरुकुल अकादमीमधून २० वर्षीय तरुण भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी पूर्व परीक्षा देवून घरी परतत असताना तालुक्यातील नेरी ते भामरे गावाजवळ महिंद्रा पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक महिती अशी की, तेजस सुरेश महेर (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे येथील रहिवासी आहे. तेजसला सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न असल्याने त्याने सैन्यात भरती होण्यासाठी जळगांव येथे गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून दि. ६ एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला होता. दि.७ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी लोहटार येथून नातेवाईकांची मोटारसायकल घेऊन पांगरे ता. कन्नड येथे जात असताना चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावाजवळ मालवाहू महिंद्रा पिकअप या चारचाकी वाहने मागून त्यास जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेने तेजस हा जागेवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागेवरच ठार झाला.

एकुलता एक मुलगा

तेजस याचे पाश्चात्य आई, वडिल व एक बहिण असा परिवार असून तेजस हा आई – वडिलांना एकुलता एक मुलगा होता. नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात येवून एकट हंबरडा फोडला. तेजसवर पांगरा ता. कन्नड येथे सायंकाळी नयन आश्रूंनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र, तेजसचे सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.

या घटने प्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरचा गुन्हा शुन्य क्रंमाकाने कन्नड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Articles

Back to top button