जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । जळगावात पोषण आहाराशी संबंधित एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेलं उंदराचं पिल्लू आढळलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात मेलेलं उंदराचे पिल्लू सापडलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंगणवाडी पोषण आहाराच्या मिक्स तांदुळाच्या पाकिटात मेलेल्या उंदराचं पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली आहे. तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. बालकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने नागरिकांसह गृहिणींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणी आता काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संबंधित प्रकरण तापलं तर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाऊ शकते किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. पण तशी कारवाई होते की नाही? याची देखील शाश्वती नाही. विशेष म्हणजे असे संतापजनक प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आणखी काही प्रयत्न का केले जात नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.