उमर्दे गावाजवळून ट्रक चोरीला ; गुन्हा दाखल

मे 8, 2021 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । एरंडोल – म्हसावद रस्त्यावरील उमर्दे गावाजवळ एम.एच.१८ ए. ए.७२३६ या क्रमांकाचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केला. ही घटना २ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजेपासून ते ३ मे रोजी सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली.

याप्रकरणी मोहम्मद अस्लम मोहम्मद यूसूफ अंसारी (रा.जामा मस्जिद , धुळे) यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला शुक्रवारी फिर्याद दिल्यावरून भाग ५ गु.र.न .७ ९ / २१ भा.दं.वि. कलम ३७ ९ प्रमाणे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस नाईक काशिनाथ पाटील, कॉन्सटेबल पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now