वर्डी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत पाटील

एप्रिल 6, 2022 12:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच संपन्न झाली. सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर उपचेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची निवड करण्यात आली आहे .

vardi

दि. ४मार्च २०२२ रोजी वड्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी निवडणुक सभा आयोजित करण्यात आली. ज्यात चेअरमनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक लिलाधर भगवान चौधरी, व्ही.पी.चौधरी, प्रमोद चौधरी, पकंज चौधरी, सचिन चौधरी, फत्तु तडवी, लुकमान तडवी, मुबारक तडवी, भागवत भालेराव, रेखा सुनिल पाटील, छाया रविन्द्र पाटील यांच्या सरपंच अजय भागवत भालेराव, अतुल भालेराव आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सभेत निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन संदीप शिंदे हे होते तर संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे व शिपाई शब्बीर तडवी यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालकांचे जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता भालेराव यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार सचिव सुनिल सुरवाडे यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now