⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | कापड दूकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी ; व्यापारी संघटनेतर्फे निवेदन

कापड दूकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी ; व्यापारी संघटनेतर्फे निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

कापड विक्रेते कोरोना पसरवण्यात कारणीभूत नसून आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करित आहोत तरी आम्हाला दूकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी मिळावी अशी मागणी एरंडोल शहर कापड व्यापारी संघटने तर्फे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस व पो. निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना शुक्रवारी ९ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत लोकडाऊनचे दूसर्याच दिवशी पूर्ण लोकडाऊन राबविल्या बद्दल कापड व्यापारी संघटनेने निषेध केला आहे.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुनील तोतला, नितीन बिर्ला, दिपक तोतला, आंबा महाजन, मोहन माळी, विजय शिंपी व इतर कापड विक्रेत्यांच्या सह्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.