दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अधिक असे की, विजय जनार्दन पाटील (वय-४९) रा. के.पी.क्लब, दत्त मंदीराजवळ भुसावळ हे ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२. ३० ते १ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच १९ एसी १९२२) ने फैजपूर येथील पिंपरूळ रोडवर टिव्हीएस शो रूम जवळ जात होते. अचानक त्यांचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडच्या बाजूला असलेल्या चारीतील झुडूपात दुचाकी घुसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला.
याघटनेसंदर्भात मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेाहेकॉ रविंद्र मोरे करीत आहेत.