जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील एका शेतकरी च्या घराचा पुढील भाग, सोमवारी रात्री १० वाजता अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.
सिंधुबाई भटा शिंदे व सून लताबाई शिंदे यांच्या घराचा पुढील भाग कोसळला असून या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर संकट कोसळले आहे. आधीत शेतातील पिक अवकाळी पावसामुळे वाया गेले. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह सिंधुबाई शिंदे यांच्या विधवा सून लताबाई शिंदे या शिलाई मशीनवर कपडे शिवून करत आहेत. त्यांचे शिलाई मशीन ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ढिगाऱ्याखाली शिलाई मशीन, पलंग, फॅन, पाण्याची मोटार, लहान लाकडी कपाट व इतर साहित्य दाबले गेल्याने सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या कठीण परिस्थितीत कुटूंबाचे नातेवाईक व ग्रामस्थ मदतीसाठी सरसावले आहेत.