शिवाजीनगर खून प्रकरण : एलसीबीच्या पथकाने एकाला पकडले

एप्रिल 4, 2022 10:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । शहरात खुनाची मालिका सुरूच असून सोमवारी पुन्हा शिवाजीनगर हुडकोजवळ खून झाला आहे. मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको असे मयताचे नाव आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने दोनच तासात एक संशयिताला ताब्यात घेतले आहे.

murder raver

जळगाव शहरात गेल्याच आठवड्यात एकाच ७.३० दोन खून झाले होते. पोलिसांनी काही तासात खुनाचा छडा लावला होता. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बर्फ फॅक्टरी गवळीवाडाजवळ मोहम्मद मुसेफ शेख इसाफ या तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मुसेफ हा हुडको परिसरात राहून हमाली काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या वर्षभरापासून तो रिकामाच असल्याने परिसरात फिरत असे.

घटना घडताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने संशयिताची गुप्त माहिती काढली. पथकातील उपनिरीक्षक लहारे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, राहुल, चालक मुरलीधर बारी यांनी काळे नगर परिसरातून अझरुद्दीन शेख अलीमोद्दीन वय-३३, रा.अमन पार्क, शिवाजी नगर याला ताब्यात घेतले आहे.

संशयिताला घटनास्थळी घेऊन जात चौकशी सुरू असून खुनाच्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात एलसीबी पथकाने पुन्हा बाजी मारली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now